Your Aadhaar Card is not being misused? Check it out.
नवी दिल्ली: सध्या छोट्या-मोठ्या प्रत्येक कामात पुरावा म्हणून मागितले जाते जाते. तुम्ही देखील किती तरी ठिकाणी आधार कार्ड वापरलं असेलच. पण , तुमच्या नकळत जर तुमच्या आधार कार्डचा वापर झाला असेल तर, ते मोठ्या फसवणुकीचे कारण बनू शकते. हे टाळण्यासाठी UIDAI ने आधार कार्डची हिस्ट्री तपासण्याचा पर्याय देखील दिला आहे. पाहा डिटेल्स.
अशी तपासा आधार कार्डची हिस्ट्री :सर्वप्रथम तुम्हाला resident.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जिथे तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात My Aadhaar पर्यायावर क्लिक करावे
लागेल. यानंतर, आधार प्रमाणीकरण इतिहास पर्यायावर क्लिक करा. जिथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल तसेच कॅप्चा कोड भरावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर एक टॅब उघडेल, जिथे तुम्हाला आधार इतिहास पाहायचा असेल तेव्हा पासूनच्या तारखा भराव्या लागतील. तसेच, OTP साठी रेकॉर्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर OTP ची पडताळणी करावी लागेल. यानंतर Aadhar History तुमच्या समोर येईल. युजर्स त्यांच्या आवडीनुसार Aadhar History डाउनलोड करू शकतात.
तुम्ही येथे तक्रार नोंदवू शकता :
आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही UIDAI च्या टोल फ्री क्रमांक १९४७ वर तक्रार करू शकता. किंवा help@uidai.gov.in या ई-मेल आयडीवरून देखील तुम्हाला तक्रार नोंदवता येईल.