\घरातल्या घरात निव्वळ एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शन एवढ्याशा गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकेल असा व्यवसाय आहे हा. मात्र यामध्ये तुम्हाला तांत्रिक ज्ञानासह मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे माहीत असणे गरजेचे आहे.
सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, गुगल प्लस, पिंटरेस्ट, ब्लॉगर अशा विविध सोशल मीडिया वेबसाइट्सवरून एखाद्या कंपनीचे वा ब्रॅण्डचे मार्केटिंग करणे. टीव्ही, रेडियो वा वृत्तपत्र-मासिकातून मार्केटिंग करण्यापेक्षा सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून मार्केटिंग करणे हे खर्चाच्या तुलनेने स्वस्त पडते, त्यामुळे लहान कंपन्या ज्यांचे मार्केटिंग बजेट कमी असते त्यांनाही सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग करणे परवडणारे असते. त्यामुळे अशा छोट्या कंपन्यांना तुम्ही सहज आपले ग्राहक करू शकता.
बिझनेस सुरू करायचा आहे? वाढवायचा आहे? यशस्वी व्हायचे आहे सोशल मीडिया हे आधुनिक माध्यम असून त्यात दररोज नवनवे बदल होत असतात, त्यामुळे तुम्हाला रोज अद्ययावत राहावे लागते. तसेच नेटसेव्ही आणि टेकसेव्ही असणे याला तर काही पर्यायच नाही. सोशल मीडिया मार्केटिंगच्या शास्त्रशुद्ध पद्धती शिकण्यासाठी तुम्ही विविध ऑनलाइन अभ्यासक्रम करू शकता.
विविध संकेतस्थळांवर वा यूट्यूबवर या विषयाचे अनेक ट्युटोरिअल मोफत उपलब्ध आहेत, त्याद्वारे अभ्यास करूनही तुम्ही चांगल्या दर्जाचे काम करू शकता.तुमच्या ग्राहकाची कंपनी व ब्रॅण्ड विविध सोशल मीडिया वेबसाइट्सच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याद्वारे ऑनलाइन लीड जेनेरेट करणे, ग्राहकांचे संदेश, सूचना कंपनीपर्यंत पोहोचवणे आदी कामे तुम्हाला करायची असतात. अत्यंत कमी खर्चात करता येण्यासारखा आणि तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देणारा असा हा व्यवसाय आहे.
सर्वात आधी तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग शिकणे अनिवार्य आहे. यासाठी अनेक कोर्स आणि युट्युब व्हिडीओज तर आहेतच. पण याशिवाय प्रत्यक्ष गोष्टी करून त्यातून रिझल्ट कसा येतो हे पाहणेसुद्धा गरजेचे आहे. यासाठी एखाद साधं प्रॉडक्ट जसं टी-शर्ट किंवा पर्सेस, मोबाईल कव्हर्स, वगैरे घेऊन त्याच डिजिटल मार्केटिंग करा.
यातून तुम्हाला आलेला रिझल्ट अर्थात तुम्ही केलेली विक्री लोकांना दाखवा. म्हणजे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल. आणि लोक स्वतःहून त्यांचं काम तुम्हाला देतील. जितक्या जास्त व्यवसायाचं डिजिटल मार्केटिंग तुम्ही कराल तितकी तुमची मागणी वाढू लागेल.