१९३० मध्ये सी. व्ही. रामण यांना म्हणजेच एका भारतीयाला प्रथमच भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले, जो विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे.
महान वैज्ञानिक सी. व्ही. रामण यांच्या स्मरणार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ संपूर्ण देशात २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान’ दिवस म्हणून साजरा केला जातो. जगातील महान वैज्ञानिकांपैकी एक असलेले प्रा. सी. व्ही. रामण यांनी केलेले काम विज्ञानाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. तसेच, त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
नेहमी संशोधनात स्वारस्य असलेले सी. व्ही. रामण हे प्रकाश विखुरण्याच्या क्षेत्रात मास्टर म्हणून ओळखले जात होते. ते त्यांच्या शैक्षणिक जीवनात टॉपर होते. प्रोफेसर रामण यांनी ध्वनीशास्त्र आणि प्रकाशशास्त्रात मोठे योगदान दिले. एक उत्तम शिक्षक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. १९१७ मध्ये त्यांची राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली.
२८ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस❓
‘रामण इफेक्ट’च्या शोधासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. प्राध्यापक सी. व्ही. रामण यांनी रामण प्रभावाचा शोध लावला आणि भौतिकशास्त्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. महान भारतीय शास्त्रज्ञाच्या या शोधाची एक अतिशय रंजक कहाणी आहे.
१९२१ साली भूमध्य समुद्राच्या निळ्या रंगाचे कारण जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढली. निळ्या रंगाचे कारण समजून घेण्यासाठी त्यांनी पारदर्शक पृष्ठभाग, बर्फाचे तुकडे आणि प्रकाश यांच्यासोबत विविध प्रयोग केले. त्यानंतर बर्फाच्या तुकड्यामधून प्रकाश गेल्यानंतर त्यांनी तरंग लांबीतील बदल पाहिला. याला रामण प्रभाव म्हणतात. या शोधाने भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले.
लवकरच सी. व्ही. रामण यांनी या नव्या शोधाची माहिती संपूर्ण जगाला दिली. त्यांचे संशोधन वर्तमानपत्रे आणि विज्ञान मासिकांमध्ये येऊ लागले. विज्ञानाच्या क्षेत्रात लोकांना खूप नवीन माहिती मिळत होती. विज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन, नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, (NCSTC) ने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
आता ३ वर्षांपूर्वीच कळणार हृदयविकाराचा धोका;
शास्त्रज्ञांनी शोधून काढले नवे तंत्रज्ञान
प्रा. सी. व्ही. रामण यांचे योगदान :
प्राध्यापक सी. व्ही. रामण यांनी तबला आणि मृदंग यांसारख्या भारतीय ढोलकांच्या आवाजाचे मधुर स्वरूप तपासले आणि असे करणारे ते पहिले व्यक्ती होते.
१९३० मध्ये प्रथमच एका भारतीयाला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले, जो विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे.
१९४३ साली त्यांनी बंगळुरूजवळ रामण संशोधन संस्था स्थापन केली.
रामण इफेक्टचा शोध लावला, ज्याचे भौतिकशास्त्रात विशेष योगदान आहे.
१९५४ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रमण यांना १९५७ साली लेनिन शांतता पुरस्कारही मिळाला होता.
सी. व्ही. रामण यांच्या महान शोधाच्या स्मरणार्थ भारत दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.