भारतात लवकरच सुरू होत आहे. सेटेलेट इंटरनेट सेवा.

Spread for Help

Starting soon in India. Satellite Internet Service.

नवी दिल्ली: काही काळापासून यांच्या भारतातील व्यवसायाच्या गुंतवणुकीबद्दल खूप बातम्या येत होत्या. आता या वृत्ताला दुजोरा मिळाला असून Elon Musk आता भारतात सॅटेलाइट इंटरनेट आणणार आहेत. म्हणजेच, आता Airtel, Vi आणि Jio यांना भारतात ब्रॉड-बँडमध्ये जोरदार स्पर्धा मिळेल यात शंका नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कची कंपनी ने आपल्या भारतातील उपकंपनीला भारतात सेवा सुरू करण्यास सांगितले असल्याची माहिती आहे.

SpaceX च्या उपग्रह ब्रॉडबँड व्यवसायाकडे लक्ष देणाऱ्या चे डिसेंबर २०२२ पर्यंत भारतात २ लाख सक्रिय टर्मिनल्ससह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे . Starlink कंपनीचे कंट्री डायरेक्टर संजय भार्गव यांनी सोशल मीडियावर यासंबंधित एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये संजय भार्गव यांनी माहिती दिली की, स्टार लिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही आता भारतात ग्लोबल बिझनेस टायकून एलोन मस्कची कंपनी SpaceX ची संपूर्ण मालकीची उपकंपनी असून Starlink आता भारतात परवान्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात करू शकते.

Starlink ने भारतात आतापर्यंत ५००० हून अधिक प्री-ऑर्डर मिळाल्याचा दावा केला आहे. कंपनीने भारतातील ग्रामीण भागात चांगली ब्रॉडबँड सेवा देण्याची इच्छा असल्याचेही व्यक्त केले. भारतीय ब्रॉडबँड बाजारपेठेत स्टार लिंक लाँचमुळे स्पर्धा अधिक कठीण होणार असून त्याचा थेट फायदा युजर्सना मिळेल माहितीनुसार, एलोन मस्कच्या इंटरनेटचा स्पीड सुपरफास्ट असेल.

स्टार लिंक आता थेट भारती समूह समर्थित कंपनी वनवेबशी स्पर्धा करेल. रिपोर्ट्सनुसार, बीटा स्टेजमध्ये ५० ते १५० MB/s डेटा स्पीड ऑफर करण्याचा Star Link चा दावा आहे. कंपनी सध्या प्रति ग्राहक ७३५० रुपये डिपॉझिट घेत असून कंपनी डिसेंबर २०२२ पर्यंत भारतात २ लाख सक्रिय टर्मिनलसह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या लक्ष्यासाठी वचनबद्ध आहे.