छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. परंतु, हे स्वराज्य स्थापण करण्यासाठी आई म्हणून जिजाबाईंनी दिलेली प्रेरणा मोठी होती. या प्रेरणेतूनच रयतेचे राज्य उदयाला आले. औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीपुढे रयत खंबीरपणे उभा राहू शकली. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णाण केली. या ताकदीची पायाभरणी संस्कार आणि शिक्षण यांच्या रुपात जिजाबाईंनी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई (Rajmata Jijabai) आज यांची तारखेनुसार 424 वी जयंती आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. परंतू, हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी आई म्हणून जिजाबाईंनी दिलेली प्रेरणा मोठी होती. या प्रेरणेतूनच रयतेचे राज्य उदयाला आले. औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीपुढे रयत खंबीरपणे उभा राहू शकली. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णाण केली. या ताकदीची पायाभरणी संस्कार आणि शिक्षण यांच्या रुपात जिजाबाईंनी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे त्यांच्या आईवडीलांनी ठेवलेले नाव जिजाबाई होते. परंतू, पुढे त्यांचे कर्तृत्व बहरले. त्यांच्या पोटी शिवाजी नावाचे रत्न जन्माला आले. पुढे त्यांना जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मॉंसाहेब अशा विविध नावांनी संबोधले जाऊ लागले. उपलब्ध इतिहासांच्या दाखल्यांनुसार जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. सिंदखेडचे लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाबाई यांचा जन्म झाला. लखूजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंसज आहेत. याच जिजाबाईंचा विवाह डिसेंबर 1605 दौलताबाद येथे शहाजीराजे यांच्याशी झाला.
शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या विवाहामुळे जाधव आणि भोसले हे एकमेकांचे व्याही झाले. परंतू, काळ मोठा विचित्र. काळाच्या ओघात जाधव भोसले घराण्यांमध्ये वाद झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की या घराण्यांनी एकमेकांच्या घराण्यांतील कर्ते पुरुष ठार केले. त्याची झळ दोन्ही बाजूला बसली. दोन्ही घराण्यांचे संबंध बिघडले.
सासर माहेर यांच्यात आलेल्या कटुतेच्या अशा कठीण काळात कोणत्याही स्त्री समोर माहेर की सासर हा प्रश्न उभा राहणार. जिजाबाई यांच्याही समोर तो उभा राहिला. परंतु, जिजाबाई यांनी आपल्या पतिसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माहेरचे नाव टाकले. सर्व संबंध तोडले. भावना, नाती यांना बाजूला सारले आणि पतिची बाजू भक्कम करण्याचे व्रत घेतले. त्यांनी आपल्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसर न सोडता छोट्या शिवबाचा शिवाजीराजा घडवला आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.
छत्रपती संभाजी महाराजांवर जिजाऊंच्या विचारांचा पगडा
गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही आऊंसाहेबांची इच्छा होती. 1655 साली जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र संभाजी हे विजापूरतर्फे लढताना मरण पावले. त्यानंतर 23 जानेवारी 1664 साली शहाजी राजे यांचे देखील निधन झाले. मात्र पतीच्या निधनानंतर देखील जिजाऊंनी हार मानली नाही. त्या जीद्दीने पुन्हा उभ्या राहिल्या. स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले. 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली.
जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा …