इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयांतर्गत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT)या संस्थेत वैज्ञानिकांच्या पदांवर भरती.
सोमवार ८ नोव्हेंबर २०२१ रोजी आलेल्या जाहिरातीनुसार (सं. NIELIT/NDL/MeitY/2021/2) सायंटिस्ट सी आणि सायंटिस्ट डी च्या एकूण ३३ पदांसाठी थेट भरती प्रक्रिया होणार आहे. सायंटिस्ट सी च्या घोषित रिक्त जागांपैकी २८ अनारक्षित आहेत. ११ ओबीसी, ४ एससी, ३ एसटी आणि २ ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. याच प्रकारे सायंटिस्ट डी च्या एकूण जागांपैकी ४ अनारक्षित आहेत आणि १ पद ओबीसी उमेदवारांसाठी आरक्षित आहे.
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार NIELIT ची अधिकृत वेबसाइट, nielit.gov.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अन्य कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नीलेट सायंटिस्ट भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोमवार ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. उमेदवार ७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत आपला ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतील. NIELIT द्वारा जारी करण्यात आलेल्या सायंटिस्ट भरती २०२१ जाहिरातीनुसार, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक पात्रता आणि अन्य अटींसंबंधी ऑनलाइन अॅप्लिकेशन पेज वर दिलेल्या निर्देशांसंबंधी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.