mParivahan App: आता डॉक्युमेंट्स जवळ नसतील तरीही दंड बसणार नाही, स्मार्टफोनच करेल तुमची मदत,पाहा

Spread for Help

अनेक वेळा लोक आवशयक कागदपत्रे घरी विसरतात आणि कागदाशिवाय गाडी चालवल्याबद्दल चलन कापले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की तुमचा स्मार्टफोनच तुमचे चलन कापले जाण्यापासून वाचवू शकतो. तुम्हाला फक्त तुमच्या फोनवर एक अॅप डाउनलोड करायचे आहे.

 कारने ऑफिस, शाळा आणि इतर कोणत्याही ठिकाणी जाताना लोक आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवतात. प्रामुख्याने ड्रायव्हिंग लायसन्स, RC, PUC तर बहुतेक लोक सोबत घेऊनच गाडी चालवतात. जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील आणि चलन टाळता येतील. पण , अनेक वेळा लोक महत्वाचे डॉक्युमेंट्स घरी विसरतात आणि मग दंड भरावा लागतो. पण, आता असे होणार नाही.
स्मार्टफोन करेल तुमची मदत

आज आम्‍ही तुम्‍हाला एम-ट्रान्‍सपोर्टबद्दल सांगणार आहोत, जे तुमचे चलन कापण्‍याचे टेन्शन संपवेल. तुम्ही जर कधी तुम्ही तुमचे पेपर विसरलात किंवा हार्ड कॉपी हरविली तेव्हा हे अॅप उपयोगी तुमच्या कामी येईल. या अॅपमध्ये तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि पीयूसी ठेवू शकता. ते कसे डाउनलोड करायचे ते जाणून घेऊया.

असे करा डाउनलोड:

सर्वप्रथम Google Play Store वर जा आणि mParivahan अॅप डाउनलोड करा. त्याचा आयकॉन लाल रंगाचा असेल. अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला साइन अप करावे लागेल. यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आवश्यक असेल. फोन नंबरसह लॉग इन केल्यानंतर, तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल. यानंतर अॅपचा इंटरफेस उघडेल, त्यानंतर तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पीयूसी अपलोड करू शकता.

जर तुम्ही कागदाशिवाय गाडी चालवत असाल आणि ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला थांबविले तर तुम्ही हे अॅप उघडून तुमचे कागदपत्र दाखवू शकता. यामुळे तुमच्यावर दंड आरकरला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *