देशातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने महिलांसाठी खास योजना आणली आहे. महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेमागचा महत्वाचा हेतू आहे. मोदी सरकारने महिलांचा विचार करुन ‘पंतप्रधान मातृत्व वंदना योजना’ आणली आहे. या योजनेमार्फेत महिलांना 6 हजार रुपये मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो पाहूयात.
मोदी सरकारने महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आणली आहे. तसे पाहता या योजनेची सुरूवात 1 जानेवारी 2017 मध्येच झाली होती. या योजनेतंर्गत आधी पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यात येत होती. पंतप्रधान गर्भावस्था मदत योजना या नावाने ही योजना आधी ओळखण्यात येत होती. म्हणजेच गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र :
दरम्यान पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आई वडिलांचे आधार कार्ड, आई वडिलांचे ओळखपत्र, मुलाचा जन्मदाखला आणि बँक खात्याचे पास बुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागणार आहे.
आई आणि मुलांची चांगल्या प्रकारे देखभाल करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं जातंय. केंद्र सरकारकडून या महिलांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. महिलांना हे पैसे तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये देण्यात येतील आणि बाळाचा जन्म झाल्यावर शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यातील 1 हजार रुपये सरकारकडून देण्यात येतील.