Microsoft Outage : ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स’ डाऊन; हजारो यूजर्सना अ‍ॅप वापरण्यास अडचणींचा सामना
Spread for Help
<p style=”text-align: justify;”>मायक्रोसॉफ्ट टीम्स व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरला जगभरात मोठ्या प्रमाणात आऊटेजचा सामना करावा लागत आहे. मायक्रोसॉफ्टने ही समस्या मान्य केली आहे आणि म्हटले आहे की, ते या समस्येवर काम करत आहेत, परंतु यूजर्सना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश करताना समस्या येत आहेत.
<p style=”text-align: justify;”>आऊटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरच्या मते, गुरुवारी, 21 जुलैच्या पहाटे मायक्रोसॉफ्ट टीम्ससाठी हजारो आऊटेज रिपोर्ट्स आले होते. गुरुवारी सकाळी सुमारे 7 वाजल्यापासून आऊटेज रिपोर्ट्स वाढू लागले आहेत आणि यूजर्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरसह समस्या नोंदवत आहेत. Downdetector अॅपच्या माध्यमातून असे दाखवले जात होते की,आऊटेज अहवालांपैकी 50 टक्के अॅपसाठी आहेत, 34 टक्के सर्व्हर कनेक्शनसाठी आहेत आणि 17 टक्के लॉगिन समस्या आहेत. या संदर्भात, मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट 365 स्टेटस ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लवकरच ही समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.
<p style=”text-align: justify;”>आता, आऊटेजची ही समस्या अजून किती काळ राहील या संदर्भात अद्याप काही सांगता येणार नसले तरी, मात्र, आऊटेड बंदच्या परिणामामुळे हजारो यूजर्सना या समस्येचा सामाना करावा लागतोय. सुमारे 7 तास उलटून गेल्यानंतरही ही समस्या कायम आहे. 
<p style=”text-align: justify;”>महत्वाच्या बातम्या : 
Xiaomi-Realme चे ‘कॉपी कॅट’ युद्ध, ट्विटर वॉर सुरू, नेमकं प्रकरण काय?
Google Pixel 6a ची प्रीबुकिंग सुरु, तब्बल 10 हजारांचा मिळणार डिस्काउंट
लवकरच येत आहे Vivo V25 Pro 5G स्मार्टफोन, लॉन्चपूर्वीच फीचर्स लीक