रिलायन्स जिओच्या बहुचर्चित जिओफोन नेक्स्ट या स्मार्टफोनची अखेर घोषणा झाली आहे. हा 4G स्मार्टफोन केवळ 1,999 रुपये देऊन खरेदी करता येणार आहे. बाकीची रक्कम ही EMI च्या माध्यमातून भरता येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ही 6,499 रुपये इतकी आहे.
रिलायन्स जिओने चार विविध प्रकारचे फोन्सची घोषणा केली आहे. हे चारही स्मार्टफोन हे EMI च्या माध्यमातून खरेदी करण्यात येऊ शकतात. या EMI चा कालावधी हा 18 महिने ते 24 महिन्यांचा असेल. फोनसाठी हा EMI केवळ 300 रुपये ते 350 रुपयांपर्यंत असेल. त्यामध्ये दर महिन्याला पाच जीबी डेटा आणि 100 मिनीटं टॉकटाईमची सुविधा देण्यात येणार आहे. JioPhone Next Large plan साठी ग्राहकांना 18 महिन्यांसाठी 500 रुपये तर 24 महिन्यांसाठी 450 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना 1.5 GB 4G डेटा मिळणार आहे.
तिसरा प्लॅन हा JioPhone Next XL या नावाचा आहे. यामध्ये ग्राहकांना 18 महिन्यांसाठी 550 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 500 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. यामध्ये 2GB हाय स्पीड 4G डेटाची सुविधा मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळणार आहे.
चौथ्या म्हणजे XXL या प्लॅनमध्ये ग्राहक 18 महिन्यांसाठी 600 रुपये तर 24 महिन्यांसाठी 550 रुपये EMI भरु शकतात. तसेच 2.5 GB हाय स्पीड 4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळणार आहे.
<p>जिओ फोन नेक्स्ट हा एक अल्ट्रा-अफोर्डेबल 4G स्मार्टफोन आहे. जो सिंगल रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा सेट अपसह येईल. जिओ फोन नेक्स्ट 2G ते 4G कनेक्टिव्हिटीसह येईल. जिओ फोन नेक्स्ट Android 11 गो-एडिशन मिळेल. याशिवाय, फोनला 5.5-इंच एचडी डिस्प्ले मिळेल. क्वालकॉमची QM 215 प्रोसेसर, 2 किंवा 3 जीबी रॅम आणि फोनमध्ये 16 किंवा 32 जीबी स्टोरेज मिळेल. ग्राफिक्ससाठी Adreno 308 GPU मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनची बॅटरी 2,500 mAh असू शकते. JioPhone Next 4G VoLTE सपोर्टसह येऊ शकतो आणि त्यात ड्युअल-सिम सपोर्ट उपलब्ध असेल.