IRCTC चा लॉग इन आयडी आणि पासवर्ड विसरला? या स्टेप्सने सहज करा रिकव्हर

Spread for Help

IRCTC  चा पासवर्ड विसरला तर ?

भारतात ट्रांसपोर्टचे सर्वात मोठे साधन आहे. दररोज कोट्यावधी लोक रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. रेल्वे तिकीट बुकिंगसाठी बहुतांश लोक इंटरनेट चा वापर करतात. IRCTC बुकिंगसाठी आयडी आणि पासवर्डची गरज असते. मात्र, रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी पासवर्डच विसरल्यास?

जर तुम्ही देखील IRCTC अकाउंटचा विसरला असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही सहज पासवर्ड रिकव्हर करू शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

असा रिकव्हर करा IRCTC अकाउंटचा पासवर्ड

  • सर्वात प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जा व त्यानंतर IRCTC अकाउंट आयडी टाका.
  • त्यानंतर फॉर्गेट पासवर्ड पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला नोंदणीकृत ईमेल आयडी, यूजर आयडी, डेट ऑफ बर्थ आणि कॅप्चा कोड टाका.
  • त्यानंतर IRCTC यूजरला ईमेल आयडीवर माहिती पाठवेल, ज्याद्वारे तुम्ही यूजर आयडी आणि पासवर्ड रिकव्हर करू शकता.
  • आता तुम्ही आईआरसीटीसी अकाउंटवर लॉग इन करतान पासवर्ड बदलू शकता. तुम्ही सोपा पासवर्ड ठेवू शकता, जो लक्षात राहील.
  • यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल व त्यानंतर फॉर्गेट पासवर्ड पेजवर जा.
  • आता तुम्हाला नवीन जनरेट केलेला पासवर्ड टाकावा लागेल. हा पासवर्ड लक्षात राहील असा ठेवा.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागेल. त्यानंतर पासवर्ड बदलेल.

आता तुम्ही नवीन पासवर्डद्वारे आयआरसीटीसी अकाउंटवर लॉग इन करू शकता.