पहिलं घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!

Spread for Help

‘या’ तारखेपर्यंतच मिळणार पंतप्रधान योजनेची सबसिडी .

औरंगाबाद–  जर तुम्ही पहिल्यांदाच घर खरेदी करत असाल तर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहकर्जासाठी 2 लाख 67 हजार रुपयांची सबसिडी दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर देशात सर्वांना घर मिळावे या उद्देशाने पंतप्रधान आवास योजना राबवण्यास सुरुवात झाली. देशातील अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून येत्या काळात योजनेचा लाभार्थी बनण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठीच ही बातमी आहे.

काय आहे नेमकी योजना :-

जे नागरिक पहिल्यांदाच स्वतःच्या नावाने घर खरेदी करत आहेत, तसेच जर त्यांना गृहकर्ज आणि रजिस्ट्रीत स्वतःच्या पत्नीचे नाव लावायचे असेल अशांसाठीच ही अडीच लाखांची सबसिडी मिळते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 18 लाख रुपयांदरम्यान आहे, अशा गृहकर्जधारकांना योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्यांचे उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे, त्यांना 6 लाखांच्या कर्जावर 6.5 टक्के सबसीडी, 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 9 लाखांच्या कर्जावर 4 टक्के सबसीडी तर 18 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 12 लाखांच्या कर्जावर 3 टक्के सबसीडी मिळते.

31 मार्च 2022 पर्यंतच मिळणार लाभ :-

दरम्यान, या पंतप्रधान आवास योजनेची मुदत येत्या 31 मार्च 2022 रोजी संपत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे घर खरेदी करण्याचा आणि होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर निर्णय तुम्हाला काही दिवसातच घ्यावा लागेल.

31 मार्चपुर्वी फाईल अपलोड करणे आवश्यक :-

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसीडीचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2022 आहे. या योजनेअंतर्गत पहिले घर खरेदी करताना गृहकर्ज घेतल्यावर बँका ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांचा अर्ज भरून घेतात. योजनेच्या सबसिडीसाठीचा अर्ज पोर्टलवर अपलोड करावा लागतो. त्यानंतर 5 व्या टप्प्यात सबसिडी गृहकर्ज खात्यात जमा होते. योजनेची मुदत 31 मार्च असली तरीही काही बँका 15 मार्च, 22 मार्चपर्यंतच ग्राहकांना मुदत देत आहेत. त्याच्या आत जर तुमचा अर्ज पोर्टलवर अपलोड झाला तरच सबसिडी मिळेल, असे सांगितले जात आहे.

सर्व महत्त्वपूर्ण Update मिळण्यासाठी खालील लिंक जॉईन करा?

https://chat.whatsapp.com/DMfVCYJeqZ05MZbta3Rvbz