Google Maps चे ‘हे’ फीचरअपघातांपासून वाचवू शकते.

Spread for Help

नवी दिल्ली: तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाहन चालवत असाल तर, वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हे केवळ तुम्हालाच नाही तर रस्त्यावरील इतर लोकांनाही अपघातांपासून वाचवते. ओव्हरस्पीडचाही वाहतुकीच्या नियमांमध्ये समावेश आहे. जे सहसा लोक उत्साहात विसरतात. ओव्हरस्पीडमुळे अपघात झाल्याची प्रकरणे भारतातच नव्हे तर जगभरात अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे वाहन अतिशय काळजीपूर्वक चालवण्याचा सल्ला देण्यात येतो. तुम्हाला ओव्हरस्पीड टाळण्यात देखील मदत करू शकते. तुम्ही वापरलेही असेल, पण तुम्हाला माहित आहे का की त्यातील एक फीचर तुम्हाला ओव्हरस्पीडिंगपासून वाचवू शकते. त्याबद्दल जाणून घेऊया.

गाडी चालवताना चे स्पीड लिमिट फंक्शन सुरु केले असेल, तर ते तुम्हाला रस्त्यावरील स्पीड लिमिटबद्दल सांगत राहते. जर तुम्ही ठराविक वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवली तर ,स्पीड लिमिट फीचर तुम्‍हाला सूचना पाठवून अलर्ट करते. Google Maps ने हे ऑन-स्क्रीन स्पीडोमीटर फंक्शन २०१९ मध्ये पहिल्यांदा लाँच केले होते.

हे फीचर वापरायचे असल्यास आधी तुम्हाला Google Maps ओपन करून नंतर उजव्या कोपर्‍यात वरच्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन तळाशी नेव्हिगेशन सेटिंग्जवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला खाली स्पीडोमीटर चालू करण्याचा पर्याय मिळेल. तुम्हाला फक्त त्यावर क्लिक करावे लागेल. मात्र, केवळ स्पीडोमीटरवर अवलंबून न राहता वेगात वाहन चालवणे टाळलेले तुमच्यासाठी आणि इतर वाहनचालकांची केव्हाव्ही चांगले.