इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 12 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ;570 जागांसाठी भरती ‼️

Spread for Help

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने आयओसीएल अप्रेंटीस उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.

आयओसीएल अप्रेंटिस भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाईट
 iocl.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
पात्र उमेदवारांची लेखी चाचणीद्वारे निवड केली जाईल.

IOCL ने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा-नगर हवेली येथे 500 हून अधिक अप्रेंटिस भरतीसाठी ही मोहीम सुरू केली आहे.
पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अप्रेंटिस ट्रेनिंग कालावधी हा एक वर्षाचा असेल. उमेदवारांनी रिजनल डायरेक्टरेट ऑफ अप्रेंटिसशिप (RDAT) कडे ट्रेड अप्रेंटिस म्हणून ऑनलाइन नोंदणी करावी किंवा बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) मध्ये टेक्निशिअन अप्रेंटिस म्हणून ऑनलाइन अर्ज करावा.

राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील:-

गुजरात – 121 पदे
महाराष्ट्र – 322 पदे
मध्य प्रदेश – 80 पदे
छत्तीसगड – 35 पदे
गोवा – 8 पदे
दादरा आणि नगर हवेली – 4 पदे
एकूण रिक्त पदांची संख्या – 570

 IOCL भरती 2022 ची शैक्षणिक पात्रता :-

कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा संस्थेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. बीई, बीटेक, एमसीए, एलएलबी आणि इतर उच्च शैक्षणिक पदवी असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जाहीर केलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे.

 सर्व महत्त्वपूर्ण Job Update मिळण्यासाठी खालील लिंक जॉईन करा?
https://chat.whatsapp.com/EG4aGz3e8GE89z0GXiUPaq
=======================
सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *