Fake Job Ads : सावधान ! नोकरीचे आमिष दाखवून चोरला जातोय तुमचा पर्सनल डेटा  

Spread for Help

फेसबुक आणि लिंक्डइन यासारख्या अॅप्सचा वापर लोक नोकरी शोधण्यासाठी करत असतात. मोठ्या रकमेचा पगार असणाऱ्या नोकरीच्या संधींची जाहिरात तुम्ही सोशल मीडियावर पाहिली असेल. अनेक वेळा विमानतळावर किंवा हॉटेलमध्ये नोकरीच्या संधीच्या जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल केल्या जातात. या जाहिरातीमधून अनेक नोकरी शोधणाऱ्या लोकांना आमिष दाखवले जावून त्यांचा पर्सन डेटा चोरी केला जातो, असा धक्कादायक रिपोर्ट नुकताच समोर आला आहे.

propublica (प्रो पब्लिका) वेब साइटच्या वृत्तानुसार, FBI, फेडरल ट्रेड कमिशन आणि सायबर सुरक्षा फर्म यांनी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्यांनी खोट्या जाहिरातींबाबत नुकताच खुलासा केला आहे. आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणार्या यू.एस. सीक्रेट सर्व्हिसने पुष्टी केली आहे की, नोकरीचे अमिष दाखवून लोकांचा वैयक्तिक डेटा चोरणाऱ्या जाहिरातींमध्ये सध्या वाढ झाली आहे. लेक्सिसनेक्सिस रिस्क सोल्युशन्सच्या सरकारी विभागाचे मुख्य कार्यकारी हेवूड टॅल्कोव्ह यांनी सांगितले, ‘नोकरीचे आमिष दाखवून वैयक्तिक डेटा चोरणाऱ्या जाहिराती फ्रॉड आणि व्हायरससारख्या असतात.

अशा फ्रॉड जाहिरातींची आत्तापर्यंत संख्या कमी आहे, परंतु ती वेगाने वाढत आहेत. मार्चमध्ये Lexis Nexis नुसार, सुमारे 2,900 अशा नोकरीच्या संधी असणाऱ्या जाहिराती अढळल्या ज्यांमध्ये नोकरीच्या पगाराचा आकडा हा संशयास्पद आहे, तसेच काही जाहिरातींमध्ये संशयास्पद ईमेल डोमेन वापरले आहेत. या जाहिरातींच्या संखेमध्ये जुलैपर्यंत एकूण 18,400 आणि नंतर या महिन्यापर्यंत 36,350 पर्यंत वाढ झाली आहे. टॅल्कोव्ह म्हणाले की, ही आकडेवारी नोकरीच्या जाहिरातींच्या छोट्या नमुन्यावर आधारित आहे आणि अशा जाहिरातींची वास्तविक संख्या कदाचित खूप जास्त असू शकते.