आयुर्वेदात लवंगेला अनन्यसाधारण महत्व आहे. मसाल्यात वापरला जाणारा हा घटक अनेक समस्यांवर उपायकारक आहे. जाणून घेऊ…
लवंग खाण्याचे फायदे❗
1. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंग खाणे फायदेशीर आहे. तसेच रोज दोन-तीन लवंग चघळल्यास खोकला आणि तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.
2. पोटात जळजळची (ऍसिडिटी) समस्या असेल तर लवंगचा खिस करून पाण्यात मिसळावे आणि सेवन करावे.
3. आयुर्वेदानुसार मधुमेहावर लवंग लाभदायी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.
4. खूप तहान लागते किंवा जास्त घाम येतो अशा व्यक्तींनी गरम पाण्यात लवंग वाटून पाण्यात मिसळून प्यावी. यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होईल.
5. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर आहे. यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल.
6. लवंगात अँटी ऑक्सीडेंट तत्व आढळतात. यामुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
7. लवंगात असणाऱ्या गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर लवंग गुणकारी आहे.
8. दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी पळून जाईल.