औरंगाबाद जिल्ह्यात काेराेनाची रुग्णसंख्या गेल्या चार- पाच दिवसांत झपाट्याने वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील आठवीपर्यंतचे वर्ग ६ जानेवारीपासून बंद करण्यात येतील.
तसेच जास्त गर्दी हाेत असलेल्या फार्महाऊस, हुरडा पार्ट्यां, र्रिसाॅर्टवरही बंदी घालण्यात आली. हाॅलमधील लग्नासाठी ५० जणांचीच मर्यादा असून मंगल कार्यालयांनी आगामी तारखांची बुकिंग आधी प्रशासनाला कळवण्याची अट घालण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काेराेनाची रुग्णसंख्या गेल्या चार- पाच दिवसांत झपाट्याने वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील आठवीपर्यंतचे वर्ग ६ जानेवारीपासून बंद करण्यात येतील. तसेच जास्त गर्दी हाेत असलेल्या हुरडा पार्ट्यां, फार्महाऊस, रिसाॅर्टवरही बंदी घालण्यात आली. हाॅलमधील लग्नासाठी ५० जणांचीच मर्यादा असून मंगल कार्यालयांनी आगामी तारखांची बुकिंग आधी प्रशासनाला कळवण्याची अट घालण्यात आली आहे.
हॉटेलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेची अट कायम आहे. मात्र प्रशासन वेळाेवेळी चित्रीकरण करणार असून मर्यादेपेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यास संबंधित हाॅटेल सील करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी दिली. विशेष म्हणजे आपत्कालिन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा टास्क फोर्स आणि शहरातील खासगी डॉक्टरांची बुधवारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपाययाेजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलिस अधिक्षक निमितकुमार गोयल, उपायुक्त डॉ. उज्जवला वनकर, वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी तसेच खाजगी डॉक्टर्स उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व रुग्णालयांतील उपलब्ध बेड्सचा आढावा घेतला तसेच ऑक्सिजनची संभाव्य मागणी लक्षात घेता सर्व प्रकल्पाबाबतही माहिती घेतली.
बेड : ‘कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वच रुग्णांलयांनी तातडीने काेराेना रुग्णांसाठी बेड वाढवावेत. सध्या जिल्ह्यात २१ हजार बेड उपलब्ध असून त्यातआणखी वाढ करावी लागेल.ज्यांना फ्लोअरवर बेड वाढवणे शक्य आहे.
अंत्यविधीसाठी फक्त २० लाेकांनाच परवानगी देण्यात येईल. त्यापेक्षा जास्त गर्दी असेल तर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगल कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचना आहेत. ग्रामीण भागात गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच शहरात वार्ड अधिकारी यांनी मंगल कार्यालयांवर लक्ष ठेवतील.
पाच कोविड सेंटर्स सुरू,होम आयसोलेशनवर भर :
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मनपाच्या आराेग्य विभागाने बंद केलेले पाच काेविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्या व्हेरिएंटमध्ये अलाक्षणिक रुग्णांची संख्या जास्त आढळून येत असल्यामुळे त्यांच्या होम आयसोलेशनला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले, ‘जास्तीत जास्त कोरोनाबाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याकडे पालिकेचा कल आहे. त्याशिवाय कॉल सेंटरही सुरू करण्यात येणार आहेत. डॉक्टर होम आयसोलेशनमधील रुग्णांशी कॉल सेंटरमधून संपर्क साधतील. रुग्णांची स्थिती बघून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याबद्दलचा निर्णयही घेतील. कॉल सेंटरसाठी दोन रुग्णवाहिका सज्ज आहेत. इतर रुग्णवाहिकाही रुग्णांच्या सेवेत असतील.
इथे आहेत काेविड सेंटर :
किलेअर्क (३०० खाटा), एमआयटी कॉलेजची दोन वसतिगृहे (प्रत्येकी ३७५ व १७५ खाटा), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह (४५० खाटा), देवगिरी महाविद्यालयाचे मुला-मुलींचे वसतिगृह (४८० खाटा), आयएचएम कॉलेजचे वसतिगृह (८० खाटा) ही केअर सेंटर्स लगेच सुरू केली जाणार आहेत.
पेट्रोल नाही :
यापूर्वी ‘नो व्हॅक्सीन, नो पेट्रोल’ अशी माेहिम राबवण्यात आली हाेती मात्र ती बारगळली. आता लसीकरण आणि मास्कशिवाय पेट्रोल न देण्याचे पुन्हा आदेश काढण्यात आले आहेत. मास्क न घालणाऱ्या चालकांचे परवाने रद्द केले आहे. चितेपिंपळगाव येथे शाळांमध्ये लसीकरणासाठी मुलांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.
-
मंगल कार्यालयात केवळ ५० जणांना परवानगी, शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द, हाॅटेलचे चित्रीकरण करणार, गर्दी आढळल्यास सील
-
महानगरपालिकेचीही युद्धपातळीवर तयारी, कंत्राटी डाॅक्टर, आराेग्य कर्मचाऱ्यांची करणार भरती, मुबलक ऑक्सिजन साठा करुन ठेवण्याच्या सूचना
-
१७ दिवसांतच शाळा पुन्हा बंद! नववी ते बारावी वर्ग मात्र सुरू
रजा : कोरोनाचे संकटामुळे जिल्हाधिकाऱ्यांने सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत. केवळ वैद्यकीय कारण असल्यास त्यांना सुटी घेता येईल. सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपुत यांची रजा नाकारली आहे.
हुरडा पार्ट्या : औरंगाबाद शहर व जिल्ह्यात सध्या व्यावसायिक हुर्डा पार्ट्या जाेरात सुरु आहेत. शनिवारी- रविवारी किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी तेथे माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेते. यातूनही संसर्ग हाेण्याची शक्यता आहे. होम क्वॉरंटाइन लक्षणे नसलेले काेराेनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेण्यास प्राधान्य देतात. रुग्णालयांवर ताण येऊ नये म्हणून प्रशासनही त्यांना तशी परवानगी देते. मात्र त्यासाठी काही नियम घालण्यात आले आहेत. लसींचे दाेन्ही डाेस पूर्ण पाहिजे.
लसीकरण न झाल्याचा परिणाम :
केंद्र सरकारने ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयाेगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग तूर्त सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र, १५ वर्षांखालील विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसल्यामुळे या वयाेगटात संसर्ग हाेण्याची भीती वर्तवली जात आहे. म्हणून पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग संसर्गाची तीव्रता कमी हाेईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. डिसेंबर महिनाअखेरपर्यंत १५ पर्यंत असलेली रुग्णसंख्या पुढील चारच दिवसांत शंभरपर्यंत वाढली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्वच माध्यमांच्या शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी तडकाफडकी काढले आहेत. या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
काेराेनामुळेच गेल्या दीड-दाेन वर्षांपासून शाळा बंद हाेत्या. मात्र रुग्णसंख्या कमालीची घटल्यानंतर २० डिसेंबरपासून शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली हाेती. त्यानुसार सर्व खबरदारी घेत विद्यार्थी शाळेतही येऊ लागले हाेते. मनपा हद्दीत शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला हाेता.
तसेच पालकांच्या हमीपत्रावरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात हाेता. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील उदासीनता दूर हाेऊन चैतन्य निर्माण झाले हाेते. मात्र, १ जानेवारीपासून पुन्हा काेराेना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुन्हा १७ दिवसांतच औरंगाबाद शहरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. या मुदतीनंतर परिस्थिती पाहून १ फेब्रुवारीनंतर शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.