<p style=”text-align: justify;”>5G Mobile Services : भारतातील दिग्गज व्यावसायिक गौतम अदानी यांचा अदानी समूह (Adani group) टेलिकॉम उद्योगात (Telecom Business) उतरण्याच्या तयारीत आहे. देशात लवकरच 5G मोबाईल सेवा (5G Mobile Service) सुरु होणार आहे. केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसारल लवकरच हा लिलाव पार पडण्याची शक्यता आहे. आता या शर्यतीत अदानी समूहाने भाग घेण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. या लिलावासह अदानी समूहाचा टेलिकॉम उद्योगात प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचं दिसून येत आहे.
<p style=”text-align: justify;”>केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार या महिन्याच्या अखेरीस 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. या लिलावासाठी अदानी समूहाने अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे. यासह अदानी समूह दूरसंचार उद्योगात शिरकाव तयारीत असल्याचं समोर येत आहे. 
<p style=”text-align: justify;”>अदानी समूहाचा लवकरच टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करण्याची शक्यता
<p style=”text-align: justify;”>अदानी समूहाने 8 जुलै रोजी लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे अदानी समूहाचा लवकरच टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अदानी समूह इतर टेलिकॉम कंपन्यांसह 5G स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुत्रांच्या या लिलावामध्ये जिओ (Jio), भारती एअरटेल (Airtel), विआय (VI) अर्था व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) या कंपन्या आधीच शर्यतीत आहेत.
<p style=”text-align: justify;”>चार कंपन्याकडून लिलावासाठी अर्ज दाखल
<p style=”text-align: justify;”>5G टेलिकॉम सेवा म्हणजेच अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यास सक्षम असलेल्या एअरवेव्हच्या लिलावासाठी 26 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. आतापर्यंत या लिलावासाठी चार कंपन्यानी अर्ज दाखल केले आहेत. Jio, Airtel आणि Vodafone Idea या कंपन्यांनी लिलावासाठी याआधी अर्ज केला होता. यानंतर आता अदान समूह लिलावासाठी अर्झ करणारी चोथी कंपनी ठरली आहे.
<p style=”text-align: justify;”>5G चा स्पीड 4G पेक्षा 10 पटीने जास्त
<p style=”text-align: justify;”>5G दूरसंचार सेवा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. 5G मोबाइल सेवेचा वेग आणि क्षमता 4G मोबाइल सेवेपेक्षा सुमारे 10 पटीने जास्त असेल. स्पेक्ट्रमचे पेमेंट 20 समान वार्षिक हप्त्यांमध्ये केले जाऊ शकते जे प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला आगाऊ भरावे लागेल. यामुळे रोख प्रवाहाची आवश्यकता कमी होईल आणि या क्षेत्रातील व्यवसाय करण्याचा खर्च कमी होईल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, स्पेक्ट्रम घेणार्‍या कंपनीला 10 वर्षांनंतर भविष्यातील कोणत्याही दायित्वाशिवाय स्पेक्ट्रम सरेंडर करण्याचा पर्याय दिला जाईल. 
<p style=”text-align: justify;”>महत्त्वाच्या इतर बातम्या
<li style=”text-align: justify;”>5G Services Rollout Soon : 5G मोबाईल सेवा लवकरच होणार सुरु; केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी
<li class=”article-title ” style=”text-align: justify;”>Covid-19 Vaccination : 5-12 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा; कॉर्बेवॅक्स, कोवॅक्सिन लसीच्या वापराला मंजुरी
<li class=”article-title ” style=”text-align: justify;”>Edible oil : खाद्य तेलाच्या दरात 15 रुपयांची कपात करावी, केंद्र सरकारचे खाद्यतेल विक्रेत्या संघटनांना निर्देश