5G Network: रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडियाला मिळाले स्पेक्ट्रम.

Spread for Help

नवी दिल्लीः ५ जीच्या टेस्टिंगसाठी केंद्र सरकारने रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडिया लिमिटेडला स्पेक्ट्रम देण्यात आले आहे. सरकारकडून गुजरातमध्ये ५ जीचे नेटवर्क चाचणी करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांना स्पेक्ट्रम आणि लायसन्स देण्यात आले आहे.

पुढील वर्षी होऊ शकते ५ जी स्पेक्ट्रमचा लीलाव संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले की, ५ जी स्पेक्ट्रमचा लीलाव पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात होवू शकतो. लीलावाचा संरचनेवर लक्ष ठेवणारे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय यावर चर्चा करीत आहे. या कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, मला असे वाटत आहे की, दूरसंचार नियामक पुढील वर्षीच्या फेब्रुवारीत किंवा अखेरपर्यंत आपला रिपोर्ट सबमिट करू शकते.

जास्तीत जास्त मार्च मधये रिपोर्ट मिळायला हवी. यानंतर तत्काळ लीलाव केला जाणार आहे. संचार मंत्री यांनी सांगितले की, ४ जी नेटवर्कचे लक्ष्य आम्ही आधीच मिळवले आहे. ५ जी साठी ७० ते ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यांचे हे वक्तव्य खूपच महत्त्वाचे आहे. कारण, याआधी दूरसंचार विभागाकडून आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत ५ जी स्पेक्ट्रम लीलाव करण्याची अपेक्षा होती.

भारताच्या दूरसंचार क्षेत्रात नियमनला सर्वश्रेष्ठ जागतिक मानकांनुसार, बनवायचे आहे. त्यामुळे यात काही सुधारणार करणार आहोत. आगामी दोन तीन वर्षात दूरसंचार नियामकची संरचना बदलायची आहे.

Reliance Jio And Vodafone Idea Gets Spectrum And License For 5g Network Testing In Gujarat State